
मुंबई – वृत्तपत्राच्या कागदावरून वडापाव, तसेच अन्य खाद्यपदार्थांची विक्री करणार्या २६ दुकानांवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांकडून १ लाख ५१ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ५ ते १६ जून या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वृत्तपत्राच्या कागदावरून खाद्यपदार्थांची विक्री करू नये, तसे केल्यास कारवाई करण्याची चेतावणी मागील आठवड्यात दिली होती. त्यानंतरही काही विक्रेते खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी वृत्तपत्राचा उपयोग करत आहेत. मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !