घटत्या लोकसंख्येमुळे चीनने विवाह न करता मुले जन्माला घालण्याची दिली अनुमती !

एकेकाळी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होता; मात्र त्याने काही दशकांपूर्वी केलेल्या कठोर कायद्यांमुळे त्याच्या लोकसंख्यात लक्षणीय घट झाली आहे. तेथील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात अल्प झाली आहे, तर वृद्धांची संख्या अधिक झाली आहे.

केनियामध्ये स्थानिक नागरिकांकडून चिनी व्यवसायिकांच्या विरोधात आंदोलन !

चीन ज्या देशात जातो, तेथील अर्थकारण स्वतःच्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करून त्या देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी करतो. केनियामध्ये हेच घडले आहे. भारतात हे घडण्याआधी सरकारने चिनी वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालावी !

अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश चीनचा विकास रोखण्याच्या प्रयत्नात ! – शी जिनपिंग, चीनचे राष्ट्रपती

अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्या या कटकारस्थानाचा अनुभव भारतानेही घेतलेला आहे. येथे काट्याने काटा काढला जात असेल, तर ते भारतासाठी चांगलेच आहे, इतकेच म्हणावे लागेल !

राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !

चीन बालवाडीपासूनच लैंगिक शिक्षण देण्याच्या प्रयत्नात !

चीनमध्ये गेल्या ५ वर्षांत एकूण १ लाख ३१ सहस्र लोकांवर बलात्कार आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण यांविषयी गुन्हे नोंदवण्यात आले. या वाढत्या गुन्ह्यांमुळे चीन सरकार लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे.

(म्हणे) ‘मी ब्रिटनमध्ये बोलू शकतो; पण भारतीय संसदेत चीनच्या घुसखोरीचे सूत्र उपस्थित करण्याची अनुमती नाही !’-राहुल गांधी

भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्‍वास ठेवील का ?

‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याने त्यांवर बंदी आणा !

चीनने केवळ सीमेवरच भारताला धोका दिला असे नाही, तर त्याने देशातील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधांवरही आक्रमण केले आहे. चिनी बनावटीच्या ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांवर बंदी आणली पाहिजे.

भारत आता चीनऐवजी जपानकडून अधिकाधिक वैद्यकीय उपकरणे आयात करणार !

एम्.आर्.आय., अल्ट्रासोनिक आदी वैद्यकीय उपकरणे आता जपानकडून विकत घेतली जातील, असा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे. पूर्वी चीनकडून ही उपकरणे विकत घेतली जात होती.

चीनने पाकिस्तानला पुन्हा दिले ४ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज !

पाकिस्तान आता अशाच प्रकारच्या भिकेवर जगणारा देश म्हणून काही मास ओळखला जाईल आणि नंतर त्याचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून संपुष्टात येईल, हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही !

सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे ! – चीन

असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.