चीन बालवाडीपासूनच लैंगिक शिक्षण देण्याच्या प्रयत्नात !

संसदेत सादर केला प्रस्ताव !

बालवाडीमध्ये लैंगिक शिक्षण देण्याचा प्रस्ताव चीनच्या संसदेत

बीजिंग (चीन) – बालवाडीमध्ये लैंगिक शिक्षण देण्याचा प्रस्ताव चीनच्या संसदेत मांडण्यात आला आहे. चीनमध्ये या प्रस्तावावरून चर्चा होत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे, ‘लैंगिक शिक्षण चीनच्या कायद्यांर्तगत आहे.’ काही जणांचा याला विरोधही आहे. ‘या शिक्षणाचा लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो’, असे म्हटले जात आहे.

चीनच्या झेजियांग प्रांतातील क्यूझोउ या भागातील एका रुग्णालयाचे डॉ. चेन वेई यांनी या संदर्भात एक प्रस्तावही बनवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लैंगिक शिक्षण तरुणांना ज्ञान, कौशल्य आणि दृष्टीकोन देईल. लैंगिक शिक्षण शाळेतील शिक्षणाचा अनिवार्य भाग आहे. शाळांमधील व्यापक लैंगिक शिक्षणासाठी बालवाडी महत्त्वाची वेळ आहे.

बलात्काराच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे चीनचा लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न !

चीनमध्ये गेल्या ५ वर्षांत एकूण १ लाख ३१ सहस्र लोकांवर बलात्कार आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण यांविषयी गुन्हे नोंदवण्यात आले. या वाढत्या गुन्ह्यांमुळे चीन सरकार लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे.