सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे ! – चीन

चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग आणि डॉ. एस. जयशंकर

बीजिंग (चीन) – चीनसमवेतच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये सीमाप्रश्‍नाला योग्य स्थानी ठेवले पाहिजे आणि सीमेवरील स्थिती सामान्य करण्यासाठी लवकरात लवकर एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.

 

किन गांग हे जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आले आहेत. गेल्या ३४ मासांपेक्षा अधिक काळ लडाखमध्ये सीमावाद चालू आहे, असेही किन या वेळी म्हणाले.