घटत्या लोकसंख्येमुळे चीनने विवाह न करता मुले जन्माला घालण्याची दिली अनुमती !

खर्चिक विवाहांवर घातली बंदी !

बीजिंग – एकेकाळी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होता; मात्र त्याने काही दशकांपूर्वी केलेल्या कठोर कायद्यांमुळे त्याच्या लोकसंख्यात लक्षणीय घट झाली आहे. तेथील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात अल्प झाली आहे, तर वृद्धांची संख्या अधिक झाली आहे. काम करण्यासाठी तरुण मिळेनासे झाले आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी चीनने अधिक मुलांना जन्म घालण्यासाठी विवाहाच्या वेळी देण्यात येणार्‍या हुंड्यावर बंदी घातली आहे. यासह अधिक खर्च करून विवाह करण्यावरही बंदी घातली आहे. विवाहामध्ये अधिक खर्च होत असल्याने अनेक जण विवाह करण्याचे टाळत होते. आता या बंदीमुळे लोक विवाह करतील. यासाठी सरकार सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे, तर विवाह न करताही मुले जन्माला घालण्यासही चीन अनुमती दिली आहे.