रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर होण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचे शनीदेवाला साकडे !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा म्हणून रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे घातले.

छत्रपती शिवरायांचा मावळा व्हा !

आज अनेक ठिकाणी हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान, ‘लव्ह जिहाद’, गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर यांसारख्या घटना घडत आहेत. या घटनांवर अनेक हिंदु धर्मीय व्यक्ती सामाजिक माध्यमांत निषेध व्यक्त करणे, तसेच या घटनांवर चर्चा करतांना वा राग व्यक्त करतांना दिसून येतात.

निष्क्रीय पुरातत्व विभाग !

पुरातत्व खात्याचे जर थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास ‘स्वत: काही न करणे, इतरांना काही करू न देणे आणि कुणी काही करत असेल, तर त्यात खोडा घालणे’, असे करता येईल.

नेवासे (जिल्हा नगर) येथे कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन

मुंबादेवी मंदिरात शिवजयंती आणि रथसप्तमी यांनिमित्ताने श्री. संतोष (भाऊ) पंडुरे यांच्या पुढाकाराने कहार समाज सेवा ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

अमेरिका येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून ग्रामस्थांना नोटीस

५० फूट उंच असलेला हा पुतळा राष्ट्रीय महामार्गावरून स्पष्ट दिसतो. तेथे ‘सेल्फी पॉईंट’ही निर्माण करण्यात आला आहे. सातारा शहराच्या वैभवात भर घालणारा हा पुतळा महामार्ग अतिक्रमण पथकाने २६ फेब्रुवारी या दिवशी काढण्यासाठी प्रयत्न चालू केले.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक ; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

DARHCT आणि CTMM चमूने अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल ! – छत्रपती उदयनराजे भोसले

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

आपण खरोखर शिवप्रेमी आहात का ?

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मनामनांत १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांविषयीची पवित्र भावना जागृत झाली; परंतु या भावनांचा महापूर तात्पुरताच रहात असेल, तर यात पालट होणे अपेक्षित आहे. छत्रपतींच्या विचारांना आपल्या आचार-विचारांमध्ये कितपत स्थान आहे ? हे शिवरायांना मानणार्‍या प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधायला हवे.

शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार परत न करणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही.