‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आणि पंजाबचे नवे सरकार यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले भाष्य !

चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते.

जपानच्या पंतप्रधानांची भारत भेट देशाच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरेल !

‘जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत. कोरोनाचा काळ निवळल्यानंतर एका मोठ्या राष्ट्रप्रमुखाने भारताला दिलेली ही पहिली भेट आहे. जपानच्या पंतप्रधानांसाठीही ही भेट महत्त्वाची आहे.

रशिया-युक्रेन युद्ध : माहिती युद्धाचा प्रत्यक्ष युद्धावरील परिणाम !

युक्रेनच्या जनतेला घाबरवण्यासाठी ‘रशिया आपल्यावर आक्रमण करणार आहे’, असा आभास निर्माण करायचा. ज्यामुळे ते त्यांच्या सरकारच्या विरोधात जातील; परंतु तसे झाले नाही. याउलट युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की हे युक्रेनचे नायक बनले.

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, ‘नार्काे टेरिरिझम’ आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.

रशियाच्या बाजूने सीरियातील इसिसचे आतंकवादी लढणार ?

एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे.

युक्रेनचा गनिमी कावा आणि त्याने केलेल्या चुका !

रशियाचे रणगाडे १००-२०० किलोमीटर परिसरात पसरले आहेत. शत्रूची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत आणि याविषयीच्या अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत.

रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये भारत सरकारने नागरिकांसाठी राबवलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेचे यश !

भारत सरकारने जोखीम पत्करून ‘ऑपरेशन गंगा’च्या अंतर्गत युक्रेनच्या युद्धभूमीवर अडकलेल्या ९० टक्क्यांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्याचे कार्य पार पाडले आणि उर्वरित भारतियांना परत आणणे चालू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्याशी संवाद !

युक्रेनमध्ये १८ सहस्र पैकी ७०० ते ८०० विद्यार्थी अजूनही अडकलेले आहेत. युद्धबंदी झाली, तरच त्यांना तेथून बाहेर येता येणार आहे. त्यासाठीच भारत या दोन देशांशी पुनःपुन्हा बोलणी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे ते भारताचे ऐकून युद्धबंदी करत आहेत !

छोटासा युक्रेन मोठ्या रशियाशी लढतो, तर मोठा भारत छोट्याशा पाकिस्तानशीही लढण्यास घाबरतो !

युक्रेनने त्यांना आत येऊ दिले आणि गनिमी कावा युद्धाच्या काही चांगल्या युक्त्या वापरल्या. या सैन्याच्या मागाहून अन्न-पाण्याची रसद (पुरवठा) घेऊन येणार्‍या सैन्यावर त्यांनी आक्रमण केले. त्यामुळे रशियाची अडचण झाली.’

रशिया-युक्रेन युद्धातून भारत काय शिकू शकतो ?

जेव्हा कठीण वेळ येतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र येतो, भारतानेही अशा प्रकारची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. युक्रेन युद्धाचा एक भारतीय या नात्याने अभ्यास करू शकतो.