दाऊदसारखे आतंकवादी मारण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांकडून नवीन तंत्रज्ञानाचा शोध !
अमेरिकेच्या शास्त्रज्ञांकडून त्यांच्या वायूदलासाठी एक ड्रोन सिद्ध करण्यात येत आहे. हे ड्रोन मनुष्याचे तोंडवळे (चेहरे) ओळखून त्यांना लक्ष्य करण्याचे काम करील. हे ड्रोन आकाशातून खाली भूमीवर लपलेल्या आतंकवाद्याचा शोध घेईल. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर एक लहान क्षेपणास्त्र सोडले जाईल की, ज्याने तो आतंकवादी मारला जाईल.