राष्ट्रीयीकृत बँकांनी मराठीतून व्यवहार करण्याची सावंतवाडी येथील प्रांताधिकार्‍यांची सूचना

मराठी पत्रकारदिनानिमित्त मनसेच्या वतीने बँकांमध्ये मराठीचा वापर करण्याविषयी निवेदन दिले होते. याची नोंद घेत येथील प्रांताधिकाऱ्यांनी ‘सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी त्यांचे व्यवहार मराठीतून करावेत’, अशी सूचना सर्व बँकांना दिली आहे.

सीबीआयच्या भ्रष्टाचारी उपअधीक्षकाच्या घरावर सीबीआयच्याच पथकाची धाड

कुंपणच जर शेत खात असेल, तर कुणावर विश्‍वास ठेवायचा ? भ्रष्ट राजकारण्यांच्या संगतीमुळे आता अन्वेषण यंत्रणाही भ्रष्ट झाल्या आहेत !

म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात भागधारक फौजदारी तक्रार करणार

म्हापसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या (म्हापसा अर्बन बँकेच्या) संचालकांच्या विरोधात फौजदारी तक्रार करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या भागधारकांनी घेतला आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी अहवाल नोंद न झाल्यास न्यायालयात जाण्याचेही ठरवण्यात आले.

भारतीय स्टेट बँकेची ४ सहस्र ७३६ कोटी रुपयांच्या फसवणूक करणार्‍या आस्थापानांच्या संचालकांचे निवासस्थान आणि कार्यालय यांवर धाडी

सहस्रो कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे करणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

नांदेड येथे शंकर नागरी सहकारी बँकेत १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा ! 

आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून अडीच कोटी रुपयांचा दंड

नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्‍या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे.

दैनंदिन व्यवहारात जिल्ह्यातील कार्यालयांतून मराठीचा वापर करण्याची सक्ती करा ! – मनसेची मागणी

जिल्ह्यातील काही बँकांचे आणि संस्थांचे अधिकारी अन् कर्मचारी परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ते हिंदीत संभाषण करत असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दैनंदिन व्यवहारात मराठीत बोलण्याची सक्ती करा……

‘सेल्फ चेक’ वापरून सांताक्रूझ पंचायतीमधील लाखो रुपये काढल्याविषयी होप फाऊंडेशन या संस्थेकडून तक्रार नोंद

‘सेल्फ चेक’ वापरून सांताक्रूझ पंचायतीच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याविषयी होप फाऊंडेशनने पंचायतीचे अधिकारी, सचिव आणि कॅनरा बँकचे अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी खात्याकडे तक्रार नोंद केली आहे.

कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या २६४ बड्या थकबाकीदारांनी थकवले अनुमाने १ लाख कोटी रुपये !

कर्जफेडण्याची क्षमता असणार्‍यांकडून थकबाकी वसूल न करणारे आणि थकबाकीदार यांवर त्वरित अन् कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.