केंद्र सरकारकडून सुदर्शन टीव्हीच्या यु.पी.एस्.सी. जिहाद कार्यक्रमाला अनुमती

केंद्रातील भाजप सरकारने सुदर्शन टीव्ही या खासगी वृत्तवाहिनीवरील बिंदास बोल या साप्ताहिक कार्यक्रमातून यु.पी.एस्.सी. जिहाद या विषयाच्या कार्यक्रमाला काही पालट करून प्रसारित करण्याची अनुमती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

‘आप’ने वीज शुल्कावर चर्चा घडवून कोळसा प्रकरणावरील लक्ष विचलित केले ! – काँग्रेसचा आरोप

राज्यात कोळसा प्रदूषणावरून रेल्वे दुपदरीकरण आणि कोळसा वाहतूक यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतांनाच ‘आप’ने राज्यातील वीज शुल्कावर चर्चा घडवून कोळसा प्रकरणावरील लक्ष विचलित करून अप्रत्यक्षपणे भाजपला सहकार्य केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

(म्हणे) ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’ – अभिनेता झिशान अय्युब यांचा प्रश्‍न

धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

घोटाळ्याचा आरोप असणारे मेवालाल चौधरी यांना केले बिहारचे शिक्षणमंत्री !

भाजपचे तारकिशोर प्रसाद केवळ १२ वी शिकलेले आहेत व त्यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिल्याने सरकारवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

गायींच्या संरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारकडून ‘गो मंत्रालया’ची स्थापना होणार

प्रत्येक राज्याने असे मंत्रालय स्थापन करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारनेच देशपातळीवर मंत्रालय स्थापन करून गो संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा !

मुंबईतील समुद्रकिनार्‍यांवर छठ पूजेला यंदा बंदी – मुंबई महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनार्‍यावर छठ पूजेला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी या वर्षी घरीच छठ पूजा साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

देहलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करण्यास देहली उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली !

कोरोनाच्या संकटामुळे देहली उच्च न्यायालयाने यमुना नदीच्या घाटांवर छठ पूजा करण्याची अनुमती नाकारली आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही धर्माचा सण साजरा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम जीवित रहायला हवे.  

राज्य मंत्रीमंडळात पालट करणे, ही काळाची आवश्यकता !

पर्यटन क्षेत्रातील विविध घटक पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्यावर नाराज झालेे आहेत.

(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !