सीतामढी (बिहार) येथे नर्सिंग होममध्ये झालेल्या अज्ञातांच्या गोळीबारात परिचारिका ठार, तर डॉक्टर घायाळ !

बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे तेथे रुग्णालयावर असे आक्रमण होणे अपेक्षित नाही. तेथील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलणार ?

पंजशीर (अफगाणिस्तान) कह्यात घेण्याचा प्रयत्न करतांना तालिबानचे ३०० आतंकवादी ठार !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून आता एक आठवडा उलटला असला, तरी अद्याप पंजशीर हा प्रांत स्वतंत्र आहे. यापूर्वीही जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानमध्ये राजवट होती, तेव्हाही पंजशीर स्वतंत्रच राहिला होता.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांकडून २ अल्पवयीन हिंदु मुलींवर आक्रमण

धर्मांधांनी पीडितांच्या साहाय्यासाठी आलेल्या पोलिसांना पिटाळून लावले

पाकच्या ग्वादर शहरातील बॉम्बस्फोटात ८ चिनी अभियंते ठार !

चीन भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकच्या आतंकवाद्यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठराखण करतो; मात्र त्याच चीनच्या नागरिकांना पाकमधील सशस्त्र संघटना लक्ष्य करते ! चीनला हे समजेल, तो सुदिन !

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा !

येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले.

पाकमध्ये शिया मुसलमानांच्या मोहरमच्या मिरवणुकीमध्ये बॉम्बस्फोट : ३ जण ठार, तर १५ जण घायाळ

जेथे मुसलमान बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करण्याचा प्रयत्न करतात, हेच या घटनेतून स्पष्ट होते ! अशा वेळी अन्य मुसलमान त्याचा विरोध करत नाहीत कि त्यांच्याविषयी शोक व्यक्त करत नाहीत !

मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण !

जेथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण होत असेल, तेथील कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

तालिबान, पाक आणि चीन १ वर्षानंतर भारतावर आक्रमण करतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !

तालिबानी संकट !

अफगाणिस्तानचा दोन तृतीयांश भाग तालिबानी फौजांनी गिळंकृत केला होता. राजधानी काबूलला त्यांनी वेढा घातला आहे. त्यानंतर तालिबानमधील स्थिती अधिक बिकट होऊन चरमसीमेला पोचेल.