काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवून आता एक आठवडा उलटला असला, तरी अद्याप पंजशीर हा प्रांत स्वतंत्र आहे. यापूर्वीही जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानमध्ये राजवट होती, तेव्हाही पंजशीर स्वतंत्रच राहिला होता. त्यामुळे आता तालिबान्यांनी पंजशीर कह्यात घेण्यासाठी आक्रमण केले असता त्याचे ३०० आतंकवादी ठार झाले आहेत.
Panjshir on Taliban Target, ‘Hundreds’ of Fighters Out to Capture Valley of Resistance.#Talibans @SiddiquiMaha shares details. pic.twitter.com/NzsNRy0H8f
— News18 (@CNNnews18) August 23, 2021
१. तालिबानने कारी फसीहुद दीन हाफिजुल्लाह याच्या नेतृत्त्वाखाली पंजशीरवर आक्रमण करण्यासाठी शेकडो आतंकवादी पाठवले होते; मात्र बगलान प्रांतातल्या अंदराब खोर्यात लपून बसलेल्या पंजशीरच्या नागरिकांनी त्यांच्यावर आक्रमण केले. यात ३०० तालिबानी ठार झाले, तसेच तालिबान्यांना मिळणारा रसद पुरवठा बंद झाला.
२. तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यापासून पंजशीर खोर्यात तालिबानविरोधी अफगाणी एकत्र येऊ लागले आहेत. यातील बहुतांश जण अफगाण राष्ट्रीय सैन्याचे सैनिक आहेत. त्यांचे नेतृत्त्व नॉर्दन अलायन्सचे प्रमुख राहिलेले माजी मुजाहिदीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करत आहेत. त्यांच्यासमवेत माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि बल्ख प्रांताचे माजी गव्हर्नर यांची तुकडीदेखील आहे. पंजशीरमध्ये ९ सहस्र सशस्त्र सैनिक आहेत.