गोवा : मेरशी येथे १२ बांगलादेशी मुसलमान कह्यात !

या सर्वांना जुने गोवे पोलिसांकडे सुपुर्द केल्यावर जुने गोवे पोलिसांनी या लोकांना मायदेशी पाठवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी विदेशी नोंदणी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाकडे (एफआरआरओ) सुपुर्द केले.

पी.एफ्.आय.च्या पनवेल येथील सचिवासह अन्य तिघांना अटक !

पनवेलमध्ये पी.एफ्.आय. संघटनेचा कापडी फलक लावून ते सभा घेत असल्याचे आतंकवादविरोधी पथकाला आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(म्हणे), ‘पुरावे असतील तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका !’ – इम्तियाज जलील, खासदार

‘देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.) विरुद्ध कारवाईचे सत्र चालूच आहे. ए.टी.एस्. त्यांचे काम करत आहे. पुरावे असतील, तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया ‘एम्.आय.एम्’चे खासदार इम्तियाज जलील यांनी २७ सप्टेंबर या दिवशी येथे दिली.

देशभरात पुन्हा एकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर धाडी !

१०० हून अधिक जणांना अटक
शाहीनबागमधून ३०, तर महाराष्ट्रातून २७ जणांना अटक

‘पी.एफ्.आय’च्या महाराष्ट्र अध्यक्षाला संभाजीनगर येथून अटक

देशविरोधी कारवाया करणारे देशविरोधी असल्याने त्यांना आजन्म कारावासाची कठोर शिक्षा केली पाहिजे !

‘एन्.आय.ए.’च्या महाराष्ट्रातील धाडीत १६ जण कह्यात !

महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.

१५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला नालासोपारा येथून अटक !

नक्षलवादाचा पूर्ण बीमोड होईपर्यंत प्रयत्न व्हायला हवेत !

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी नौकेतून २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

गुजरातच्या समुद्रामध्ये ४० किलो वजनाचे २०० कोटी रुपये मूल्याचे अमली पदार्थ असणारी एक पाकिस्तानी नौका कह्यात घेण्यात आली.

कोलकात्यातून २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या विरोधात कोलकाता येथे केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

वांद्रे (मुंबई) आणि बंगाल येथून संशयित जिहादी कह्यात

बंगाल स्पेशल टास्क फोर्स एस्.टी.एफ्. पोलिसांनी मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने केलेल्या कारवाईत ३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सद्दाम हुसेन खान (वय ३४ वर्षे) याला मुंबईतील निर्मलनगर, वांद्रे परिसरातून आणि समीर हुसेन शेख (वय ३० वर्षे) याला बंगालमधून अटक केली.