१५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला नालासोपारा येथून अटक !

मुंबई – कारू हुलास यादव या झारखंड राज्यातील नक्षलवाद्याला महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील धानीव परिसरात असलेल्या रामनगर चाळीतून अटक केली. १८ सप्टेंबरच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. झारखंड पोलिसांनी या नक्षलवाद्याला पकडून देणार्‍याला १५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. कारू हुलास यादव हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा वर्ष २०१४ पासून सक्रीय सदस्य आहे. झारखंड येथील पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. वैद्यकीय उपचारांसाठी तो महाराष्ट्रात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. आतंकवादविरोधी पथकाने धाड टाकून या नक्षलवाद्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

नक्षलवादाचा पूर्ण बीमोड होईपर्यंत प्रयत्न व्हायला हवेत !