Jammu Kashmir Terrorist Encounter : काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एका सैन्याधिकार्‍याला वीरमरण

किश्तवाड (जम्मू-कश्मीर) – येथे सुरक्षादलांनी घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार केले; मात्र यात सुबेदार कुलदीप चंद यांना वीरमरण आले. सुंदरबनीच्या केरी-बट्टल भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ही घटना घडली. आतंकवाद्यांकडून ४ रायफसलह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. किश्तवाड जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून ‘ऑपरेशन छत्रू’ चालू असतांना ही चकमक उडाली.

संपादकीय भूमिका

आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचे मूळ म्हणजे पाकिस्तानला नष्ट करा !