साधकाला स्वप्नात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा लाभलेला सत्संग आणि सत्संगामुळे आध्यात्मिक लाभ होऊन थकवा न्यून होणे

आज सकाळी १० वाजता झोपेत असतांना मला स्वप्नात दिसले, ‘मी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना माझ्या त्रासांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला प्रसाद दिला. त्यांनी स्वतःच्या वहीतील पानाचा तुकडा फाडून आध्यात्मिक लाभासाठी मला दिला.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या अनमोल सत्संगात साधिकेने अनुभवलेले क्षणमोती !

मुंबई सेवाकेंद्रात जातांना सद्गुरु अनुताई आणि पू. जाधवकाकू आम्हाला भेटायला आल्या. स्वयंपाकघरात सेवा करणाऱ्या सर्वांना त्या भेटत होत्या. ‘आई जशी सर्व लेकरांना प्रेम देते, त्याप्रमाणे मला त्या दोघींचे वागणे आहे’, असे जाणवले.

ठाणे येथील सेवाकेंद्रात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट झाल्यानंतर मृत मुलाची आठवण येऊनही रडू न येणे

‘मुलाला लवकर मुक्ती मिळावी’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करतांना किंवा अन्य वेळी त्याची आठवण येऊन मला रडू येत असे; परंतु सद्गुरु अनुताईंना भेटल्यानंतर मला त्याची आठवण झाली, तरी रडू येत नाही.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची सेवा करतांना साधिकेला श्री दुर्गादेवीच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

एकदा सद्गुरु अनुताईंच्या खोलीत सेवेसाठी जाण्यापूर्वी मी दाराजवळ उभी राहून प्रार्थना करत होते. त्या वेळी मला जाणवले, ‘सद्गुरु अनुताईंच्या ठिकाणी साक्षात् श्री दुर्गादेवी विराट रूपात आहे.’

साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर साधकांना प्रीतीने सांभाळणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर !

सद्गुरु अनुताई सेवेतील चुकांवर साधकांना तत्त्वनिष्ठतेने दृष्टीकोन देतात. तेव्हा त्यांच्यामध्ये मारक भावातील प्रीती जाणवते. त्या वेळी साधकांची साधना व्हावी, ही त्यांची तळमळ आणि प्रीती खर्‍या अर्थाने लक्षात येऊन कृतज्ञता वाटते.

ठाणे सेवाकेंद्रातील साधकांनी (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या चरणी अर्पण केलेले कृतज्ञतारूपी कवितापुष्प !

‘सद्गुरु अनुताई साधकांसाठी अखंड झटत असतात. ‘साधकांनी घडावे, त्यांनी साधनेत पुढे पुढे जावे’, याची त्यांना साधकांपेक्षाही अधिक तळमळ असते. त्यांनी आम्हा साधकांना जे दिले, ते शब्दातीत आहे. 

प्रीतीस्वरूप आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण प्रत्येक क्षणी आचरणात आणणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर (वय ४९ वर्षे) यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘साधेपणा’ हा सद्गुरु अनुताईंचा स्थायी भाव आहे. प.पू. गुरुदेवांप्रमाणे त्यांचे राहणीमान अत्यंत साधे; परंतु नीटनेटके आहे. ‘सद्गुरु अनुताई म्हणजे ईश्वराचे सगुण रूप, जे अतिशय सुंदर असून एका क्षणातच ‘आपण त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे’, असे आहे.

सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्राचा भाग प्रकाशमान दिसणे आणि डोक्याच्या मागे प्रभावळ दिसणे यांसंदर्भात त्यांना स्वतःला अन् साधकांना आलेल्या अनुभूती

उद्या फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (२९.३.२०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

राष्ट्र-धर्माच्या कार्याला साधना आणि आध्यात्मिक उपाय यांची जोड द्या ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

समाजात वाढत्या रज-तमामुळे ज्या प्रमाणात नकारात्मकता आहे, त्या प्रमाणात भाव-भक्ती नाही. पूर्वी ऋषिमुनींना त्रास भोगावे लागले होते. आताही प्रत्येक मनुष्याला जीवनात पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, अनिष्ट शक्तींचे त्रास यांसारख्या विविध आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

आधुनिक वैद्यांनी औषधोपचार करूनही जखम लवकर बरी न होणे आणि सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेला नामजप केल्याने वेदना न्यून होऊन जखम ठीक होणे

सद्गुरु अनुताईंनी दिलेल्या नामजपामुळे माझ्या वेदना न्यून होऊन जखमही बरी झाली.