सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर या सद्गुरुद्वयींनी गालावरून प्रेमाने हात फिरवल्यावर श्री भवानीदेवीला केलेल्या प्रार्थनेचे स्मरण होणे अन् तिनेच ती इच्छा पूर्ण केल्याचे अनुभवणे

सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. १.७.२०२२ या दिवशी त्या दोघी परत जायला निघाल्या. त्या वेळी त्यांची भेट झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद्गुरु अनुराधा वाडेकर
सद्गुरु स्वाती खाडये

१. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या पावन करकमलांचा (हातांच्या बोटांचा) स्पर्श गालाला झाल्यावर ‘श्री भवानीमाता’ सूक्ष्मातून हात फिरवत असल्याचे जाणवून संपूर्ण देह चैतन्याने न्हाऊन निघणे 

‘सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत पुणे येथील कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि तिचे आई-बाबा (सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) आणि श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)) जाणार होते; म्हणून मी त्यांना भेटण्यास गेले होते. त्या वेळी सद्गुरु ताईंनी मला जवळ बोलावून माझ्या उजव्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. त्या वेळी माझ्या संपूर्ण देहावर रोमांच आले आणि ‘मी चैतन्यात न्हाऊन गेले आहे’, असे मला जाणवले.

वर्ष २०२१ मध्ये प्रतिदिन मी ‘श्री भवानीदेवी’ला प्रार्थना करत असे, ‘हे भवानीमाते, तुझा स्पर्श मला अनुभवायचा आहे.’ ज्या वेळी सद्गुरु ताईंनी माझ्या गालांवरून प्रीतीने हात फिरवला, त्या वेळी मला सूक्ष्मातून भवानीदेवीचा आवाज ऐकू आला, ‘बाळा, तुझ्या गालांना मीच स्पर्श केला आहे.’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला आणि देवीस्वरूप असणार्‍या सद्गुरु स्वातीताईंविषयी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या पावन करकमलांचा स्पर्श गालाला झाल्यावर सर्वत्र पांढरा प्रकाश दिसून चैतन्य मिळणे आणि निर्विचार स्थिती अनुभवणे

कु. अपाला औंधकर

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनाही नमस्कार करण्यासाठी मी सर्वांच्या समवेत गेले होते. सद्गुरुताई सर्वांकडे आनंदाने पाहून नमस्कार करत होत्या. अकस्मात् त्यांनी मला बोलावले आणि म्हणाल्या, ‘‘अपाला, तू मला भेटलीच नाहीस ! ये.’’ त्यांनी असे म्हटल्यानंतर मी देहभान विसरून गेले. ‘त्यांचे बोलणे माझ्या मनापर्यंत कधी पोचले आणि मी त्यांच्याकडे केव्हा गेले’, हे माझे मला कळलेच नाही. त्यांनी मला जवळ घेतले आणि माझ्या गालांवरून प्रेमाने हात फिरवला. त्या वेळी मला सर्वत्र ‘पांढरा प्रकाश’ दिसू लागला. मला एक क्षण संपूर्ण निर्विचार स्थिती अनुभवता आली आणि मला चैतन्य मिळाले.

‘प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले), आपलेच सगुण रूप असलेल्या दोन्ही सद्गुरुताईंची प्रीती मला अनुभवता आली, तसेच दिव्यानुभूतीही घेता आली. हे चैतन्य माझ्या रोमरोमांत साठून राहू दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ही अनुभूती दिल्याबद्दल आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (११.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.