सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. हेमंत पुजारे आणि श्री. प्रीतम नाचणकर यांनी केलेल्या कविता येथे दिल्या आहेत.
जीवनाचा प्रवास कधी खडतर वाटला नाही, केवळ तुमच्यामुळे (टीप) ।
सतत साधनारत राहिलो, केवळ तुमच्यामुळे ।
‘संसार समष्टीचा आणि केवळ प्रीती गुरूंची खरी’,
हे मनावर बिंबले…केवळ तुमच्यामुळे ।। १ ।।
अल्पबुद्धी असणाऱ्या जिवावर गुरूंची एवढी कृपा सतत होते … केवळ तुमच्यामुळे ।
गुरूंच्या चरणी ‘कृतज्ञता’ व्यक्त करण्याची संधी मिळते, केवळ तुमच्यामुळे ।
आज या जिवाचा श्वास चालू आहे, केवळ तुमच्यामुळे ।। २ ।।
टीप – सद्गुरु अनुराधा वाडेकर
– श्री. हेमंत पुजारे, मुंबई (२६.४.२०२२)
साखरेची गोडी जशी, तशी गुरुदेवांची प्रीती ‘अनुताई’ ।
मातीचा गंध, फुलातील मकरंद ।
बासरीचा नाद, हृदयातील श्वास ।
साखरेची गोडी जशी,
तशी गुरुदेवांची प्रीती ‘अनुताई’ (टीप) ।। १ ।।
प्रेमाचे बोल, सागराहूनी खोल ।
ज्यांचा सहवास, साधनेचा प्रवास ।
त्यांची सहज कृती देई आत्मानुभूती ।। २ ।।
अशा सद्गुरु ताईंचा सत्संग आम्हाला लाभला ।
चैतन्याचा हा झरा गुरुमाऊलीनेच दिला ।
कृतज्ञ राहूया, नित्य अनुभवूया, नित्य अनुभवूया ।। ३ ।।
टीप : सद्गुरु अनुराधा वाडेकर
गुरुमाऊलीच्या प्रीतीचा सदैव अनुभव देणाऱ्या सद्गुरु अनुताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई (२६.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |