श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये !

उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना ईश्‍वराकडून मिळत असलेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची वैशिष्ट्ये देत आहोत . . .

उतारवयातही आध्यात्मिक जीवनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या दिवशी सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे आजोबा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

‘ऑनलाईन’ राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनात साधक अधिवक्त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षी ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन घेण्यात आले.त्या वेळी काही साधक अधिवक्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती देत आहोत . . .

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी सौ. योगिता चेऊलकर यांना आलेल्या अनुभूती

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले.

नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.

सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी संत आणि श्रीकृष्ण यांचे पाद्यपूजन करवून बगलामुखी याग करवून घेणे 

सकाळी ६ वाजता मी नामजप करतांना प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून माझ्यासमोर येऊन बसले. ‘पुष्कळ दिवसांनी आज प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आले आहेत’, हे पाहून माझे मन आनंदी झाले. मी त्यांची पाद्यपूजा केली.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप करतांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांना आलेल्या अनुभूती

‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.

तिरूवण्णामलाई (तमिळनाडू) येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात आला कार्तिक दीपोत्सव !

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, अरुणाचलेश्‍वर पर्वतावर कार्तिक दीप लावण्यात आला. प्रतिवर्षी कार्तिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी तिरुवण्णामलाई येथील अरुणाचलेश्‍वर मंदिर आणि अरुणाचल पर्वतावर सुंदर असा एक मोठा दीप प्रज्वलित केला जातो

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सतत स्वार्थी विचारांचे वादळ मनात चालू असणारा माणूस झोपल्यानंतर चांगला दिसत नाही; मात्र बाळ छान दिसते; कारण त्याचे मन निर्मळ आणि सुंदर असते. असेच संतांचे आहे. वयाने मोठे असणारे संतही झोपल्यानंतर बाळासारखे सुंदर दिसतात !

निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या भावामुळे पुनर्प्रसारणाच्या वेळीही लोकप्रिय ठरलेली ‘रामायण’ मालिका !

या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल !