भारतविरोधी पत्रकारांनंतर राहुल गांधी यांची भारतविरोधी अमेरिकी खासदाराशी भेट
नवी देहली – देशविरोधी वक्तव्ये करणार्या आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणार्या शक्तींमागे उभे राहणे, ही राहुल गांधी(Rahul Gandhi) अन् काँग्रेस (Congress) पक्षाची सवय आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. अमेरिकेच्या दौर्यावर असतांना राहुल गांधी यांनी उघडपणे भारतविरोधी विधाने केली. त्यावर शहा यांनी ही टीका केली. शहा पुढे म्हणाले, ‘‘जम्मू-काश्मीरमधील देशविरोधी आणि आरक्षणविरोधी धोरणाला पाठिंबा देणे असो किंवा विदेशांतील मंचांवर भारतविरोधी बोलणे असो, राहुल गांधी यांनी नेहमीच देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तसेच त्यांनी भारतियांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा दाखवला आहे.’’ भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, राहुल पूर्वी ‘बालिश कृत्यांमध्ये’ मग्न होते; पण आता ते ‘धोकादायक कामात’ गुंतले आहेत.
संपादकीय भूमिकागृहमंत्री अशा व्यक्तीला कारागृहात का टाकत नाहीत ? |