मुंबई – किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला. जर तुम्ही हे केले नाही, तर आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. जर घरात नातू मातृभाषेत बोलला नाही, तर त्याचे आजोबाशी नाते जोडणार कसे ? आता आई-वडिलांना वेळ नसतो, फक्त आजी-आजोबांना वेळ असतो. त्यामुळे प्रत्येकाला मातृभाषा येणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौर्यावर आहेत. ८ सप्टेंबरला त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांनी लालबागचा राजा गणपतीचे दर्शन सपत्नीक घेतले. तत्पूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मातृभाषेचे महत्त्व सांगितले.
या वेळी अमित शहा म्हणाले, ‘‘बाँबे नको मुंबई हवे’, ही मागणी ज्या वेळी चालू झाली, त्या वेळी मीही ही मागणी केली होती. त्या वेळी ‘मुंबई समाचार’ने हेडलाईन केली होती की, ‘मुंबईच हवे.’ काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप मुंबईचे महत्त्व न्यून करत असल्याचा आरोप केला होता.’’