End Naxal Menace : मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादाचा अंत होईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान

रायपूर (छत्तीसगड) – मार्च २०२६ पूर्वी देशात नक्षलवादाचा अंत होईल. त्याविरुद्धची मोहीम आता निर्णायक वळणावर आहे. आता या समस्येवर कठोर आणि निर्दयी रणनीतीने आक्रमण करण्याची वेळ आली आहे. आता ही समस्या छत्तीसगडमधील काही निवडक भागांपुरती मर्यादित आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. नक्षलवादाच्या संदर्भात ७ राज्यांच्या अधिकार्‍यांसमवेत घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. अमित शहा सध्या छत्तीसगड राज्याच्या ३ दिवसांच्या भेटीवर आहेत.

गृहमंत्री शहा म्हणाले की, राज्यांनी नक्षलवादाशी संबंधित आंतरराज्य प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवावे. २ महिन्यांत नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पण धोरण नव्या स्वरूपात आणले जाईल. देशात नक्षली हिंसाचाराच्या घटना न्यून होत आहेत. वर्ष २०१० मधील उच्च पातळीच्या तुलनेत नक्षल हिंसाचारात ७३ टक्के घट झाली आहे.

संपादकीय भूमिका

देशातून जिहादी आतंकवाद आणि सर्व प्रकारची जिहादी मानसिकता यांचाही  अंत करण्याचा दिनांक केंद्र सरकारने घोषित करावा !