वायनाड भूस्खलनावरून गृहमंत्री अमित शहा यांचा केरळच्या साम्यवादी सरकारवर घणाघात !
नवी देहली – केरळ सरकारला वायनाड भूस्खलनासारख्या आपत्तीच्या शक्यतेसंदर्भात आधीच चेतावणी देण्यात आली होती. सहसा अनेक राज्ये अशा चेतावण्यांकडे लक्ष देतात; परंतु केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यसभेत बोलतांना केरळ सरकारवर केला. या वेळी त्यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आणि घायाळ झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त केले.
शहा म्हणाले की,
१. मला सभागृहासमोर स्पष्ट करायचे आहे की, २३ जुलैला केरळ सरकारला भारत सरकारकडून चेतावणी देण्यात आली होती. यानंतर २४ आणि २५ जुलै या दिवशीही अतीवृष्टी अन् भूस्खलन यांविषयी चेतावणी देण्यात आली होती.
२. २६ जुलैला २० से.मी.पेक्षा अधिक पाऊस पडेल आणि दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मातीही पडू शकते आणि लोक त्याखाली गाडले जाऊन मरू शकतात, असेही सांगण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|