न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

न्यूयॉर्क येथील बफेलो भागातील जेफरसन अव्हेन्यूजवळ असलेल्या टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले.

अमेरिकेने षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले ! – इम्रान खान

अमेरिकेने विरोधी पक्षांना हाताशी धरून षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले. या षड्यंत्राचे समर्थन करणार्‍यांना पाकिस्तानच्या भविष्याची चिंता नाही.

‘मोदी सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावणे थांबवावे !’

‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या नीतीतून अशी विधाने करून भारताला जगभरात अपकीर्त करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंचा वंशसंहार होत आहे, याविषयी हे नेते कधी तोंड उघडतत नाहीत, हे लक्षात घ्या !

अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल ! – रशिया

आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी पाश्‍चात्त्य देशांच्या विचारसरणीत स्वार्थ दडला आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांचे एकमेकांतील संबंध ताणले जातील आणि लवकरच अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल, अशी चेतावणी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी येथे केले.

इलॉन मस्क यांनी ट्विटरला विकत घेण्याच्या करारावर आणली स्थगिती !

यामागे सामाजिक माध्यमावर साधारण ५ टक्के खोटी खाती असल्याचे त्यांनी कारण दिले आहे. अशी खाती बंद करण्याची मस्क यांची पूर्वीपासून भूमिका आहे. ट्विटरबरोबर झालेल्या कराराचा मस्क पुनर्विचार करू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

चंद्रावरील मातीत रोप उगवण्यात वैज्ञानिकांना यश !

अमेरिकेतील फ्लोरिडा विश्‍वविद्यालयातील एना-लिसा पॉल आणि प्रा. रॉबर्ट फर्ल यांनी हे संशोधन केले असून त्यांना चंद्राची केवळ १२ ग्रॅम माती मिळाली होती. त्यांनी ११ वर्षे संशोधन करून चंद्राच्या मातीत रोप उगवले.

भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते.

तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी आहेत, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये सैन्य पाठवून तिसर्‍या महायुद्धाचा धोका पत्करायचा नाही ! – जो बायडेन

बायडेन पुढे म्हणाले की, सध्या जगात एकाधिकारशाही आणि लोकशाही यांच्यात युद्ध चालू आहे.