डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ट्विटरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घातलेली बंदी उठवली. त्यांना आता पुन्हा ट्विटर खाते चालू करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते. आता ट्विटरची मालकी टेस्ला आस्थापनाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे गेली असून त्यांनी वरील घोषणा केली.