‘मोदी सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावणे थांबवावे !’

कॅनडातील शीख नेत्याचा जळफळाट !

डावीकडून न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओटावा (कॅनडा) – भारतातील मुसलमान समाजाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना, तसेच अशा घटनांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहून फार चिंता वाटू लागली आहे. मला भारतातील त्या परिस्थितीची फार काळजी वाटत आहे. मोदी सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकवण्याचे थांबवून मानवी हक्कांचे संरक्षण केले पाहिजे, अशी टीका कॅनडातील न्यू डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह यांनी ट्वीट करून केली. ‘सर्वत्र शांततेच्या दिशेने काम करण्यासाठी कॅनडाने भक्कम भूमिका बजावली पाहिजे’, असे सिंह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेनेही केले होते भारतविरोधी विधान !

जगमीत सिंह यांच्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनीही भारतविषयी विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन होणार्‍या घटनांवर आम्ही लक्ष ठेवून असतो. भारतासमवेत यासंदर्भात नियमितपणे, तसेच सातत्याने चर्चा करत असतो. भारतातील काही राज्य सरकार, पोलीस आणि कारागृह प्रशासन यांच्याकडून होणार्‍या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनांवरही आमचे लक्ष आहे.’ या विधानावर भारतानेही प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘भारतालाही अन्य देशांच्या संदर्भात अशी विधाने करण्याचा अधिकार आहे’, अशा शब्दांत बजावले होते.

संपादकीय भूमिका

  • ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या नीतीतून अशी विधाने करून भारताला जगभरात अपकीर्त करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. भारतात गेल्या अनेक दशकांपासून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंचा वंशसंहार होत आहे, याविषयी हे नेते कधी तोंड उघडतत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • भारत सरकारने अशा नेत्यांना कठोर शब्दांत समज देऊन त्यांना भारतात येण्यावर बंदी घातली पाहिजे ! कॅनडातील बहुतेक शीख नेते आणि त्यांच्या संघटना खलिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करत आहेत, हे अनेकदा समोर आले आहे, त्यामुळे सरकारने अशांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !