न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील बफेलो भागातील जेफरसन अव्हेन्यूजवळ असलेल्या टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले. आक्रमणकर्त्याला पकडण्यात आले आहे. १४ मे या दिवशी ही घटना घडली. आक्रमणकर्ता सैन्याच्या वेशभूषेत होता. त्याच्याकडे शिरस्त्राणही होते. त्याच्याकडे एक कॅमेरा होता ज्याद्वारे ही घटना ‘लाईव्ह स्ट्रीम’ (संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करणे) केली जात होती.