स्कॉटलंड येथे ‘एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त सादर करण्यात येणार हिंदु देवतांचे विडंबन असणारे नाटक !

विदेशात हिंदु देवतांच्या होणार्‍या विडंबनाविरुद्ध अन्य देशांतील हिंदू आवाज उठवतात; पण हिंदूबहुल भारतातील सरकारी यंत्रणा आणि बहुतांश हिंदुत्वनिष्ठ संघटना मात्र गप्प बसतात ! हे त्यांना लज्जास्पद !

ट्विटरकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद याचे खाते एक घंट्यासाठी बंद !

भारताच्या केंद्रीय मंत्र्यांचे खाते बंद करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. यातून ट्विटरची दादागिरी दिसून येते. केंद्रशासनाने ट्विटरची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आता आणखी कठोर होण्याची आवश्यकता आहे !

जगभरातील १३८ देशांनी गेल्या ६ वर्षांत अवैधरित्या रहाणार्‍या ८ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

अवैधरित्या प्रवेश करणे, कागदपत्रांमध्ये पालट करणे, काम करण्याचा व्हिसा संपल्यानंतरही परत न जाणे आदी कारणांमुळे जगभरातील १३८ देशांमधून पाकिस्तानी नागरिकांना हाकलण्यात आल्याच्या घटना वर्ष २०१५ पासून मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेला आमच्या हवाईतळाचा वापर करू देणार नाही ! – पाक

यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !

अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज रहा ! – उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांचा सैन्याला आदेश

‘वर्कर्स पार्टी’च्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सैन्य आयोगाच्या दुसर्‍या बैठकीत किम जोंग सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी देशातील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शस्त्रसज्जता वाढवण्याचा आदेश दिला.

कोरोनामुळे भारत उद्ध्वस्त झाला ! – डोनाल्ड ट्रम्प

कोरोना हा ‘चिनी विषाणू’च असल्याचे सूतोवाच
चीनने अमेरिकेला हानीभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (अनुमाने १० लाख कोटी रुपये) देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.

युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत

गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.

अलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकने भेट म्हणून पाठवलेले आंबे स्वीकारण्यास अनेक देशांचा नकार !

पाकची जगभरात नाचक्की ! ‘पाकची आतंकवादी वृत्ती पहाता तो आंब्यांच्या नावाखाली बॉम्ब पाठवण्याच्या भीतीमुळे तर या देशांनी पाकचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला नाही ना ?’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ?

कोरोनाच्या उत्पत्तीसाठी वुहानमधील नव्हे, तुमच्या प्रयोगशाळेची चौकशी करा ! – चीनचे अमेरिकेला आव्हान

चीनने अमेरिकेला आव्हान देत बसण्यापेक्षा जागतिक मत त्याच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्यावे. तसेच कोरोनाच्या निर्मितीविषयी जे सत्य आहे, ते जगाला सांगायला हवे !

केवळ ९० दिवस !

उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…