टेक्सास (अमेरिका) – अमेरिकेतील टेक्सास, ओक्लाहोमा आणि अर्कान्सास या राज्यांमध्ये २६ मे या दिवशी आलेल्या चक्रीवादळामुळे १८ जणांचा मृत्यू झाला,तर ४२ हून अधिक जण घायाळ झाले. वादळ, गारपीट आणि जोरदार वारा याांमुळे अनुमाने १० कोटी लोक प्रभावित झाले आहेत. इलिनॉय, केंटकी, मिसूरी आणि टेनेसी या शहरांची सर्वाधिक हानी झाली. बेसबॉलच्या आकाराच्या गारा येथे पडत आहेत. अर्कान्सासच्या गव्हर्नर साराह हकाबी सँडर्स यांनी आणीबाणी घोषित केली आहे.
‘नॅशनल ओशनिक टमॉस्फेरिक डमिनिस्ट्रेशन’च्या म्हणण्यानुसार अमेरिकेत प्रतिवर्षी चक्रीवादळांमुळे अनुमाने ५० लोकांचा मृत्यू होतो. वर्ष २०११ मध्ये तेथे विनाशकारी चक्रीवादळ आले होते, ज्यामध्ये ५८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.