Eric Garcetti Minorities In Democracy : (म्हणे) ‘लोकशाहीत अल्पसंख्यांकांना समान वागणूक देणे आवश्यक !’

भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांचे वक्तव्य !

एरिक गार्सेटी

मुंबई – लोकशाही व्यवस्थेत अल्पसंख्यांक समुदायासह समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळत आहे का ?, हे पाहिले पाहिजे. त्यांच्या मनात समान वागणूक मिळत असल्याची भावना असणे अत्यावश्यक आहे. समानता, विविधता आणि सर्वसमावेशकता ही तत्त्वे केवळ निवडणुकीचा भाग असू शकत नाहीत. ते कायमस्वरूपी असावे, असे वक्तव्य अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी येथे केले. उद्योगासंदर्भात येथे अमेरिकी दूतावासाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गार्सेटी बोलत होते.

गार्सेटी पुढे म्हणाले की, लोकशाही कशी जपावी ?, यावर मी भाष्य करणार नाही. भारतीय नागरिक त्यांच्या लोकशाहीची काळजी घेतील.

संपादकीय भूमिका

भारत शासन लोकशाही व्यवस्था चालवण्यास सक्षम आहे. त्यामुळे भारताला उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा स्वत:च्या देशातील कृष्णवर्णियांवरील आक्रमणांविषयी गार्सेटी यांनी आत्मपरीक्षण करावे. भारताने अमेरिकेतील लोकशाहीची दुर्दशा दाखवणारा अहवाल जगासमोर सादर केला पाहिजे !