
नवी देहली – अमेरिकेसारख्या प्रगत देशात सध्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तेथे कर्करोग आदी रोगांसाठी लागणार्या औषधांची कमतरता भास आहे. अमेरिकेत औषधांचा तुटवडा सध्या राष्ट्रीय सुरक्षेचे सूत्र बनले आहे. ‘आय.आय.एफ्.एल्. सिक्युरिटीज’ने म्हटले आहे की, अमेरिकेत वर्ष २०२३ मध्ये ३०० ते ३१० औषधांचे दर स्थिर राहिल्यानंतर वर्ष २०२४ मधील पहिल्या तिमाहीत ३२३ औषधांच्या किमती वाढल्या. एप्रिल २०२४ पर्यंत २२ आरोग्य केंद्रांत २३३ औषधांचा तुटवडा निर्माण झाला. कोरोना महामारीच्या काळात अमेरिकेत ऋतूमानानुसार होणारे आजार बरे होण्यासाठी औषधांची मागणी वाढली होती. यामुळे औषध निर्मिती करणार्या आस्थापनांवर या मागणीच्या पूर्ततेसाठी दबाव वाढला होता.

त्यातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे औषध निर्मितीसाठी लागणार्या साहित्याच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला. अमेरिकेतील औषध तुटवड्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय औषध निर्माता आस्थापनांना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ‘भारतात औषधांची निर्मिती करणार्या आस्थापनांनी अमेरिकेतील या संकटाचा लाभ घेतल्यास त्यांना आर्थिक वर्ष २०२५ मध्ये चांगली कमाई होऊ शकते’, असे मुंबईतील ‘रेटिंग्स अँन्ड रिसर्च’ आस्थापनाने म्हटले आहे.
अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !
घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump