US F-35 Jet Crashes : अमेरिकेचे ‘एफ्‘-३५’ हे प्रगत लढाऊ विमान कोसळले !

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमान ‘एफ्-३५’  न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क विमानतळावर नुकतेच कोसळले. या अपघातात वैमानिक घायाळ झाला असून उपचारांसाठी त्याला ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको’च्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या विमानाची किंमत १ सहस्र १२५ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या २ मसांत न्यू मेक्सिकोमध्ये लढाऊ विमानाचा झालेला हा दुसरा अपघात आहे. मागील मासात राज्याच्या दक्षिणेकडील भागात ‘हॉलोमन एअर फोर्स बेस’जवळ एक ‘एफ्-१६’ हे लढाऊ विमान कोसळले होते.