Hush Money Case : अश्‍लील आरोपांच्या प्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी !

  • दोषी सिद्ध झालेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष !

  • सर्व ३४ आरोपांमध्येही दोषी असल्याचे सिद्ध !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एका प्रकरणात न्यूयॉर्क न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ट्रम्प यांच्या शिक्षेचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीच्या वेळी स्वतः निर्दोष असल्याचा दावा ट्रम्प करत होते. दोषी असल्याचे ऐकल्यावर मात्र ते न्यायालयातच निर्विकारपणे बसून होते.

काय आहे प्रकरण ?

पॉर्नस्टार (अश्‍लील चित्रपटात काम करणारी अभिनेत्री) स्टॉर्मी डॅनियल्स हिने ट्रम्प यांच्याशी तिचे संबंध आहेत, असा आरोप केला होता. वर्ष २०१६ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी हे सूत्र दाबण्यासाठी ट्रम्प यांनी डॅनियल्स यांना १ लाख ३० सहस्र डॉलर्स (१ कोटी ८ लाख रुपये) दिल्याचा आरोप ट्रम यांच्यावर होता एवढेच नाही, तर ही रक्कम देण्यासाठी ट्रम्प यांनी आर्थिक गैरव्यवहार केला आणि त्यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या माध्यमातून ती रक्कम डॅनियल्स यांना दिली. ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या सर्व ३४ आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.