डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव संमत

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव प्रतिनिधीगृहात चर्चेनंतर संमत करण्यात आला. महाभियोगाचा प्रस्ताव १९७ विरुद्ध २३२ मतांनी संमत झाला. त्यातही रिपब्लिकन पक्षाच्या १० खासदारांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता हा प्रस्ताव १९ जानेवारीला सिनेटमध्ये आणला जाईल. ट्रम्प यांच्याविरोधात यापूर्वीही महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध दोनदा महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ट्रम्प समर्थकांनी संसदेत हिंसाचार घडवून आणल्यानंतर प्रतिनिधीगृहाने ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याचा निर्णय घेतला.