काही जण मरणारच आहे ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

‘मला क्षमा करा. काही जण मरणारच आहेत. वाहतुकीमुळे एखाद्याचा मृत्यू होतो; म्हणून तुम्ही एका चारचाकी वाहनाचा कारखाना बंद करू शकत नाही’, असे विधान ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी त्यांच्या घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले.

चीनच्या विरोधात अमेरिकेत २० अब्ज डॉलरचा खटला प्रविष्ट

चीनच्या विरोधात अमेरिकेत २० अब्ज डॉलरचा खटला प्रविष्ट

अमेरिकेत शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी सिद्ध केले लंगर (अन्नदान)

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक वैद्यकीय कर्मचारी रात्रं-दिवस झटत आहेत. अशा कर्मचार्‍यांना साहाय्य म्हणून आणि खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी लंगर (अन्नदान) म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे सिद्ध केली आहेत.

अमेरिकेत लुटालूट होण्याच्या भीतीने लोकांची शस्त्रखरेदीसाठी गर्दी !

कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने भारतातही लुटालूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सरकारने आतापासूनच यावर ठोस उपाययोजना काढली पाहिजे !

तांब्याच्या वस्तूंवरील विषाणू काही मिनिटांतच नष्ट होतात ! – संशोधनाचा दावा

तांब्याच्या वस्तूंवर एखादा विषाणू असला, तर तो काही मिनिटांतच नष्ट होतो, असा दावा संशोधनातून करण्यात आला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी तो इटलीमध्ये झाला होता ! – इटलीच्या डॉक्टरचा दावा

इटलीच्या डॉक्टरांना नोव्हेंबर २०१९ मध्ये न्युमोनियाचे काही रुग्ण आढळले होते. या रुग्णांमध्ये सामान्यतः असणार्‍या न्युमोनियाच्या लक्षणांपेक्षा वेगळ्या प्रकारची लक्षणे आढळली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकत असतांनाही युरोप आणि अमेरिका येथील जनता करत होती मौजमजा !

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर त्याची तीव्रता लक्षात येत आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव होत असतांना अनेक देश त्याकडे गांभीर्याने पहात नव्हते. युरोपमधील इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, तसेच अमेरिका येथे जनता त्याकडे गांभीर्याने न पहाता मौजमजा करत होती; मात्र आता तेथील स्थिती अत्यंत वाईट…

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.