मुंडे प्रकरणात शरद पवार यांची भेट घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याची हकालपट्टी करा ! – भातखळकर

मुंबई – बलात्काराचा आरोप असलेले सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे. या प्रकरणी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भातखळकर पुढे म्हणाले की, पोलीस अधिकार्‍यांनी शरद पवारांसह चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत कि मुख्यमंत्री ? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणार्‍या या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, पाठीमागून सूत्र हालवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी.