पणजी – ‘आयआयटी’ प्रकल्प सत्तरीत नको असेल, तर तो कुडचडे येथे नेण्यास मी सिद्ध आहे, असा दावा कुडचडेचे आमदार तथा कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,‘‘सरकार शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प अन्यत्र स्थलांतर करू इच्छित असेल, तर कुडचडे मतदारसंघात ‘आयआयटी’ प्रकल्प स्थापण्यास मी इच्छुक आहे. कुडचडे मतदारसंघात यापूर्वी या प्रकल्पासाठी ९ लाख चौ.मी. भूमी निश्चित करण्यात आली होती. कुडचडे मतदारसंघातील लोक ‘आयआयटी’ प्रकल्पाचे निश्चितच स्वागत करतील. याविषयी लहानसहान समस्या असल्यास त्या सोडवता येतील; मात्र सरकारने अजूनही प्रकल्प अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलेला नाही.’’