नागालँडच्या विधानसभेत ५८ वर्षांनी वाजवण्यात आली राष्ट्रगीताची धून !

राज्याच्या विधानसभेत ५८ वर्षांनी राष्ट्रगीत ‘जन गण मन..’ची धून वाजवण्यात आली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होण्यापूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली.

मेंढ्यांना क्रौर्यतेने वागणूक देणार्‍या २ धर्मांधांवर कराड (जिल्हा सातारा) येथे गुन्हा नोंद !

ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करून त्यांचे हाल करणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा दिल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असेच जनतेला वाटते.

कार्यालयीन कामाचे वेगवेगळ्या वेळांचे नियोजन आखण्यासाठी केंद्रशासनाने राष्ट्रीय धोरण आखावे !

कार्यालयीन कामाची सकाळी १० ते सायंकाळी ५ या पारंपरिक वेळेची मानसिकता पालटून वेगवेगळ्या वेळांचे नियोजन करणे आवश्यक आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाची आरोग्य विभागाकडून तपासणी

राज्यातील इतर जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेतील पालटाचीही तपासणी हाती घेण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून गर्दी जमवणार्‍या भाजपच्या २ पदाधिकार्‍यांसह ‘डी’ मार्टवर गुन्हा नोंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मागील ४८ घंट्यांत कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात नियमावली जाहीर

शहरातील कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी महापालिकेने मंगल कार्यालय, हॉटेल, जीम, बाग, कोचिंग क्लासेस आणि दुकाने या ठिकाणी नियमाहून अधिक गर्दी आढळल्यास दंड आणि एक मासासाठी दुकान सील करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे.

अमरावती येथील श्री अंबादेवीचे मंदिर रात्री साडेसात वाजेपर्यंतच खुले रहाणार !

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, उपाहारगृह, बाजारपेठ आदी आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये राज्य सरकारने महाशिवरात्रीला राजयोगी स्नानाऐवजी साधारण स्नान ठेवल्याने संन्यासी आखाडे संतप्त !

हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये कुठल्याही पक्षाच्या सरकारने हस्तक्षेप न करता साधू, संत, महंत आणि शंकराचार्य यांना त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे.

संतांना विश्‍वासात घेतल्याविना कुंभमेळ्याचा कालावधी निश्‍चित होऊ शकत नाही !

जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे.

पँगाँग सरोवरापासून आपण मागे हटलो, तरी वेळ आल्यास तेथे ३ घंट्यांत  पुन्हा पोचू ! – माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक

कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ, ‘आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही’, असा मुळीच होत नाही.