ठाणे – मागील ३ दिवसांपासून कल्याण-डोंबिवली भागातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. मागील ४८ घंट्यांत कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमवून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या डोंबिवली येथील संदीप माळी या पदाधिकार्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात, तर कल्याण येथे हळदी-कुंकू कार्यक्रमाद्वारे गर्दी जमवणार्या भाजपचे संदीप गायकर या माजी नगरसेवकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातील नियमांचे पालन न केल्याप्रकरणी बैल बाजार येथील ‘डी’ मार्ट आस्थापनाच्या विरोधात कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच दोन्ही शहरांमध्ये विनामास्क फिरणार्यांच्या विरोधात पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.

देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप