अमरावती येथील श्री अंबादेवीचे मंदिर रात्री साडेसात वाजेपर्यंतच खुले रहाणार !

श्री अंबादेवी

अमरावती – जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, उपाहारगृह, बाजारपेठ आदी आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २० फेब्रुवारी या दिवशी दिले. तसेच येथील प्रसिद्ध श्री अंबादेवीचे मंदिरही प्रतीदिन रात्री ७.३० वाजता बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. २१ फेब्रुवारी या दिवशी दळणवळण बंदी असल्याने मंदिरही पूर्णतः बंद रहाणार आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने येणार्‍या भाविकांना केले आहे.