संकरित गायींचे दुष्परिणाम लक्षात आल्याने आगामी काळात देशी गायींचे महत्त्व वाढणार ! – भाई चव्हाण, आझाद हिंद शेतकरी संघटना

शेण विकून भरघोस उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाल्याने आता कोकणामध्ये पुन्हा गोकुळ अवतरण्यास वेळ लागणार नाही.

वाहनाच्या संदर्भातील कागदपत्रांच्या नूतनीकरणाला मुदतवाढ

ज्या वाहनधारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयूसी किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ या दिवशी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर

येथील शासकीय रुग्णालयात आकस्मिक रोग विभागात एकाच खाटावर २ रुग्णांना झोपावे लागत आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असतांना खाट मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

सांगली महापालिका क्षेत्रात ५ खासगी रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून चालू करा ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

सांगलीतील मेहता रुग्णालय आणि कल्लोळी रुग्णालय, मिरजेतील भारती, वॉनलेस आणि सेवासदन या रुग्णालयांचा समावेश आहे. ही रुग्णालये शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू

होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.

शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.

म्हादईच्या संयुक्त पहाणीवरून गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये तीव्र मतभेद : दोन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयाला निरनिराळे अहवाल सुपुर्द करणार

म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्‍यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.

घटना निर्मात्यांच्या कल्पनेतील ‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात ! – शरद अरविंद बोबडे, सरन्यायाधीश

‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे

जनतेला मद्यपी बनवणारे शासनकर्ते नकोत !

साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये मागील ५ वर्षांत झालेल्या मद्यविक्रीचे मूल्य ६५ सहस्र कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. मद्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकारात हे सूत्र उघडकीस आले आहे.

कुंभमेळ्यातील संतांच्या व्यवस्थेसाठी विशेष समितीची स्थापना ! – बंशीधर भगत, शहरविकास मंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले.