सांगली महापालिका क्षेत्रात ५ खासगी रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून चालू करा ! – नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त

नितीन कापडणीस

सांगली, २८ मार्च – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने महापालिका क्षेत्रातील ५ खासगी रुग्णालये ३० मार्चपासून कोरोना रुग्णालय म्हणून चालू करण्याचे आदेश सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यात सांगलीतील मेहता रुग्णालय आणि कल्लोळी रुग्णालय, मिरजेतील भारती, वॉनलेस आणि सेवासदन या रुग्णालयांचा समावेश आहे. ही रुग्णालये शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.