रामनाथी, गोवा येथील सौ. आराधना चेतन गाडी यांना भक्तीसत्संगात आलेल्या अनुभूती

भक्तीसत्संगात माझे अस्तित्व विसरून ‘मी एक वेगळ्या लोकात आहे आणि तिथे चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवत होते तसेच माझ्या ठिकाणी साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे अस्तित्व मला अनुभवता आले.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाघोली येथील शाळेच्या कार्यालयात मनसेची तोडफोड !

अशी वेळ का येते ? याचा विचार शाळा प्रशासन करणार का ?

कल्याण रेल्वेस्थाकावर आढळले ५४ डिटोनेटर !

येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण रेल्वेस्थानकाच्या जवळ एका बेवारस बॅगमध्ये ५४ डिटोनेटर (स्फोटके) आढळून आली आहेत. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळण्यावर बहिष्कार !

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरून त्यांची शैक्षणिक हानी करणे कितपत योग्य ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले हा सत्तेचा गैरवापर ! – शरद पवार, खासदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला आणि चिन्ह दुसर्‍याला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्याविषयी काहीच होऊ शकत नाही. पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा, यासाठी माझ्यासह मल्लीकार्जुन खर्गे, डी. राजा, तसेच तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे

मृद आणि जलसंधारण विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटला !

मृदू आणि जलसंधारण विभागाच्या एका अधिकार्‍याने ही प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास साहाय्य केल्याची चर्चा आहे. याचे पुरावेही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

शाळेतील सुरक्षिततेच्या नियमांविषयी महापालिका प्रशासनाचे विभाग अनभिज्ञ !

सुरक्षिततेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या शाळेवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! शाळेला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाणीव करून देणे, हे शाळेसाठी लज्जास्पद आहे !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी उत्कट भाव असणारे बेतिया (बिहार) येथील राजपुरोहित राकेशचंद्र झा !

येथील ५६ मंदिरांचे राजपुरोहित श्री. राकेशचंद्र झा हे गेल्या ३ वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी आहेत आणि समितीद्वारे आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नियमित सहभाग घेतात.

मागील ३ दिवसांत ४ सहस्र कोटी रुपयांचे २ सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार एक परदेशी नागरिक ! सहस्रो रुपयांचे अमली पदार्थ सापडणे म्हणजे तरुण पिढी मनाने प्रचंड प्रमाणात कमकुवत होत असल्याचे द्योतक !

२४ फेब्रुवारीपासून गावोगावी ‘रस्ता बंद’ आंदोलन !

मराठा आरक्षण मिळूनही जरांगे यांचे आंदोलन चालूच ! ३ मार्चला सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी ‘रस्ता बंद’ची चेतावणी !