कल्याण रेल्वेस्थाकावर आढळले ५४ डिटोनेटर !

असुरक्षित कल्याण शहर !

स्फोटके

कल्याण – येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण रेल्वेस्थानकाच्या जवळ एका बेवारस बॅगमध्ये ५४ डिटोनेटर (स्फोटके) आढळून आली आहेत. या प्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे. बाँबशोधक पथकाने ही स्फोटके कह्यात घेतली आहेत. रेल्वेस्थानकात एका सरकत्या जिन्याखाली (‘एस्केलेटर’खाली) ही स्फोटके ठेवण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

यामागे मोठा घातपात घडवण्याचे षड्यंत्र होते का, याचीही चौकशी व्हायला हवी !