बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळण्यावर बहिष्कार !

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचा निर्णय !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला; पण या उत्तरपत्रिका पडताळण्यावर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बहिष्कार घातला आहे. वेतनवाढ, पेन्शन (निवृत्ती वेतन), पदभरती अशा विविध मागण्यांसाठी या शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षीही महासंघाने उत्तरपत्रिका पडताळणीवरील बहिष्कार घातला होता; मात्र काही मागण्या मान्य झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. त्यांच्या काही मागण्या अजूनही पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा बहिष्कार घालण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरून त्यांची शैक्षणिक हानी करणे कितपत योग्य ?