वाघोली – येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रोडीजी पब्लिक शाळेमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. दहावीच्या काही विद्यार्थ्यांचे शुल्क भरणे बाकी असल्याने शाळेने बोर्डाच्या परीक्षेचे सभागृह तिकीट विद्यार्थ्यांना दिले नव्हते. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून ‘आधी शुल्क भरा, मग सभागृह तिकीट देतो’, असा आदेश शाळेने दिला होता. गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या मनमानी कारभाराला पालक वैतागले होते. या कारभाराविरुद्ध पालकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी बोलणी केली. त्यानंतर मनसेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र शाळेच्या मनमानी कारभाराला वैतागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या कार्यालयाची तोडफोड केली.
संपादकीय भूमिकाअशी वेळ का येते ? याचा विचार शाळा प्रशासन करणार का ? |