मृद आणि जलसंधारण विभागाच्या पदभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटला !

नागपूर – महाराष्ट्र राज्यशासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध पदांसाठी परीक्षा चालू आहेत. २० आणि २१ फेब्रुवारी या दिवशी ही परीक्षा झाली; परंतु २१ तारखेला अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मृद आणि जलसंधारण विभागाच्या एका अधिकार्‍याने ही प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरवण्यास साहाय्य केल्याची चर्चा आहे. याचे पुरावेही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच तलाठी भरती परीक्षेतही अपप्रकार झाल्याचे अनेक पुरावे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून दिलेत; मात्र शासनाकडून अद्यापही कारवाई झालेली नाही.

संपादकीय भूमिका

पेपर फूटत नाही, अशी परीक्षाच आता शिल्लक राहिलेली नाही. ही दुःस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्यांना कडक शासन झाले पाहिजे !