१. भक्तीसत्संगाच्या वेळी झालेला आध्यात्मिक त्रास
अ. ‘पूर्वी मला आध्यात्मिक त्रासामुळे भक्तीसत्संग चालू असतांना ‘त्यातील चैतन्यामुळे सारखी ग्लानी येणे आणि सत्संगात सांगितलेले विषय काही वेळा न कळणे’, असे त्रास होत होते. भक्तीसत्संगात आध्यात्मिक उपाय होऊन शेवटी त्रासाचे प्रमाण न्यून होत असे.
२. त्रास अल्प असतांना भक्तीसत्संगाला उपस्थित असतांना अनुभवलेली भावस्थिती आणि आलेल्या अनुभूती
अ. १३.७.२०२३ या दिवशी भक्तीसत्संग चालू असतांना माझे मन निर्विचार झाले.
आ. माझा नामजप आपोआप होऊ लागला आणि ‘माझे ध्यान लागत आहे’, असे मला जाणवत होते.
इ. या भक्तीसत्संगात माझे अस्तित्व विसरून ‘मी एक वेगळ्या लोकात आहे आणि तिथे चैतन्याचा वर्षाव होत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या ठिकाणी साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे अस्तित्व मला अनुभवता आले.
ई. मला एक वेगळी स्थिती अनुभवता येत होती. माझे मन संपूर्णपणे भावविभोर झाले होते. नंतर माझ्या मनातून मला एकाच नामजपाचा आवाज ऐकू येत होता, ‘सच्चिदानंद परब्रह्म, सच्चिदानंद परब्रह्म, सच्चिदानंद परब्रह्म !’
उ. ही स्थिती अनुभवत असतांना ‘आता दुसरे काही नको. केवळ आणि केवळ याच स्थितीत रहावे’, असे मला वाटत होते.
माझी ही स्थिती संपूर्ण भक्तीसत्संग संपेपर्यंत होती. मी त्या स्थितीत सूक्ष्मातून मधे मधे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या श्री चरणी कृतज्ञतापुष्पे वहात होते.’
– सौ. आराधना चेतन गाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२३)
|