प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील चि. जश्रीता मंजुनाथ पुजारी (वय २ वर्षे) !

जश्रीता एक मासाची असतांना आम्ही भ्रमणभाषवर लावलेला श्रीकृष्णाचा पाळणा आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गायलेले ‘तुम्ही राम हो तुम्ही कृष्ण हो’, हे गीत तिला फार आवडत असे.

धर्माचरणाची आवड आणि गुरूंप्रती भाव असलेली कुशलनगर (कर्नाटक) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. खुशी मृत्युंजय कुरवत्ती (वय १३ वर्षे) !

एकदा मडिकेरी येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा होती. खुशीच्या नकळत तिच्या शिक्षकांनी तिचे नाव घेतले. तेव्हा मला वाटले, ‘ती एकटीच मेडिकेरी येथे कशी जाणार ?’ तेव्हा खुशीने मला सांगितले, ‘‘गुरु आहेत. ते काळजी घेतील.’’ नंतर तिला तिच्याच शाळेच्या बसमधून मडिकेरी येथे नेण्यात आले. तिला त्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

गुरूंप्रती भाव असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उडुपी, कर्नाटक येथील कु. सात्त्विक सुधींद्र राव (वय ७ वर्षे) !

एकदा त्याने घरातील ५ आसंद्या व्यवस्थित लावल्या. आम्ही विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आजोबा (प.पू. भक्तराज महाराज) आणि स्वामी आजोबा (परात्पर गुरु डॉक्टर) येणार आहेत.’’

मुंबईत १ कोटी ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे पावडर असलेले चेंडू बाळगणारा धर्मांध अटकेत !

गुन्हेगारीत पुढे असणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई कधी होणार ? सोन्याच्या चेंडू प्रकरणातील टोळीचाही पोलिसांनी तातडीने शोध घ्यायला हवा !

रामनाथी आश्रमाचा परिसर, स्वागतकक्ष आणि ध्यानमंदिर पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेची छायाचित्रे पहातांना ‘ते सगळे माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटले.’ 

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगापूर्वी आणि सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

‘सनातन प्रभात’ नियतकालिकासाठी मराठी लिखाणाचे कन्नडमध्ये भाषांतर करण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने’, हा मराठी भाषेतील ग्रंथ कन्नड भाषेत भाषांतरित करतांना ‘प.पू. गुरुदेव आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने अत्यंत आदराने वाचली. त्यांचे कन्नडमध्ये भाषांतर करतांना मला त्यांतील चैतन्य जाणवले.

सौ. सुप्रिया माथुर यांनी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून सनातनच्या देवद आश्रमातील कु. मनीषा शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कु. मनीषा शिंदे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी गोव्यातील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. या प्रक्रियेच्या अंतर्गत त्या व्यष्टी साधनेचा आढावा सौ. सुप्रिया माथुर यांना देत असत. आढावा देतांना कु. मनीषा शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना झालेले आढाव्याचे लाभ येथे दिले आहेत.