रामनाथी आश्रमाचा परिसर, स्वागतकक्ष आणि ध्यानमंदिर पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

कु. आरती चव्हाण

१. ‘मी सनातनच्या रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा मला आश्रमाच्या परिसरातील मंदिरांतील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांच्या मूर्ती पाहून आनंद झाला.

२. मला स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पाहून चैतन्य जाणवले.

३. ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेची छायाचित्रे पहातांना ‘ते सगळे माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटले.’

– कु. आरती उमाजी चव्हाण, शेडेगाळी, बेळगाव. (वय १५ वर्षे) (३१.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक